तात्या

तात्या

तात्या म्हणजे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व. ते म्हणतात ना "मूर्ति लहान पण कीर्ति महान". हे तंतोतंत लागु होईल असे लाल बहादुर शाश्री, सचिन तेंदुलकर, अ. र. रेहमान या दिगज्जान्प्रमाने यांचे कर्तुत्व आहे हे नक्की. अत्यंत साधी राहानिमान असणारे तात्या विचारांनी मात्र उच्च आहेत.
व्यवसाय म्हणून "डॉक्टर"की करणारे तात्या म्हणजे आमचे फॅमिली डॉक्टर. लहानपनापासुन आम्ही सगळे बहिन-भावंडे तिकडेच वार्या करीत असू. त्यांना पाहताच आमचा आजार कुठल्या कुठे पलुन जात असे. फ़क्त B.A.M.S. केलेले तात्या M.D. केलेल्या डॉक्टरनाही लाजवतिल इतका त्यांचा अदभूत हातगुण!!
त्यांची treatment करायची पध्दतही तितकीच साधी-सरल-सोपी...३०-५० रुपयांपेक्षा जास्त फी कधीही त्यानी मागितली नाही.

आताच काही दिवसान्पुर्विचा एक किस्सा सांगतो...
मी पुण्याहून नाशिकला शनिवार-रविवार सुट्टी असल्याने घरी गेलो...थोड़ी तब्येताही ठीक नव्हती. सर्दी-ताप-खोकला या त्रिकुतामुले हैरान जालो होतो. पुण्यात उपचार करून जास्त काही फरक पडला नाही. तात्याच आता माज्हे तारणहार आहेत याची मला खात्री होती.

माज्हा नंबर आल्यावर मी केबिन मधे शिरलो...तात्यांना सगळे जे काय होते ते सविस्तरपने सांगुन टाकले...थोडा ताप आलेला होता मला...आणि सर्दी-खोकल्याने हैरान जालो होतो मी...तात्यांनी  मला खडसाविले ते असे -
तात्या - "आपण जेवण करने सोडतो का?
मी(खाबरत...वादल येते की काय ही शंका मनात!) - "अ..नाही.."
तात्या -  "...मग व्यायाम करने का सोडतो?...जितके वेला जेवण करतो तितके वेला व्यायाम केला पाहिजे..काय?"
मी - "हो...थोडा खंड पडला आजारपनामुले अणि काम वाढल्यामुले...
तात्या - "काहीही जाले तरी थोडा वेळ काढला पाहिजे..."
मी(होकारार्थी) - "हो तात्या...मी पुन्हा व्यायाम करायला सुरुवात करणार आहे..."

असे हे आमचे तात्या! त्यांना माज्हा साष्टांग नमस्कार! हे इश्वरा! त्यांना समाजातील पीडीतांचे कल्याण करण्याकरीता दीर्घायुष्य लाभू दे हीच मनःपूर्वक प्रार्थना...

Popular posts from this blog

पुलिस मामा...

Animadvert(Speak Up)!!